सगळं खाऊन टाक!
सगळं खाऊन टाक!
आज एक गोड ईमेल आलं. चॉकलेट खाऊन झालं की त्याचा बॉक्स फेकून न देता खाता आला तर?

हा फोटो पाहून तर मला सुरूवातीला विश्वासच बसला नाही. पण इंटरनेटवर थोडी शोधाशोध केली आणि कळलं की ही माहिती खरीच आहे.

मज्जा ना! अशा चॉकलेट बॉक्सना ’ईट इट ऑल’ (Eat it all) म्हणतात. म्हणजे, सगळं खाऊन टाक.

अशी गोड गोड भेट दिली तर घेणाराही खुश. पुन्हा रिकाम्या खोक्याची कटकट नाही म्हणून दुहेरी आनंद.

निरनिराळ्या आकारांमुळे व सजावटीमुळे छोट्यांबरोबरच मोठ्यांनाही याचा मोह पडला तर नवल वाटायला नको.

मला तर खात्री आहे की भेट देण्याच्या किंवा आणखी कसल्याही निमित्ताची वाट न पहाता मोठी माणसंच हे चॉकलेट घरी आणतील.

खाण्याच्या आनंदासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जर सर्जनशीलता अशीच उपयोगात येऊ लागली, तर आपलं आयुष्य किती गोड होईल नाही?
Read more / या लेखात पुढे वाचा...